अध्याय २५ – अळ्ळावण मुळ्ळावण – ३०

सत्यनारायणाची पूजा झाल्यावर २ किंवा ३ दिवसांनी नववधूच्या माहेरची मंडळी मुलीस माहेरी आणण्यासाठी जात. तिथे त्यांचा पाहुणचार केला जाई  आणि ते नववधूस घेवून स्वगृही (नवरीच्या माहेरी) परत येत असत. नंतर नवर्या मुलाकडील काही पाहुणे (यांना मुह्रायी असे म्हटले जात असे) नवरीच्या माहेरी येत, त्यांना पाहुणचार करून मुलीची (नवरीची) ओटी भरून व तिच्या डोक्यावरून फुलांची जाळी घालून तिला सासरी परत पाठवत असे. यास वयाने किंवा अल्लावण मुल्लावण असे म्हणत.

वधूस इकडून व तिकडून इकडे आणणे हा विधी लेवा पाटीदारांची कृषी प्रधान संस्कृती असल्याने शेताच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत ओउत नेणे, नांगर, पेरणी, कोळपे (वाखाराचे एक चास) यास आरदन म्हणतात. आणि शेताच्या दुसर्या टोकापासून पुन्हा त्याच टोकावर ओउत परत आणणे यास मुरडण म्हणतात. यो आरदन व मुरडण यावरून लेवा पतीदारामधील लग्न कार्यात अल्ल्वावन मुल्ल्वान असे अपभ्रंशाने म्हणायला लागले. यामागील मुख्य उद्देश म्हणजे दोन्हीकडील पाहुण्यांचे ओळख परिचय व्हावा व स्नेह संस्कृती जपण्याचा संस्कार घडावा असा होता.  काही ठिकाणी ह्या विधीस बोळवण म्हणतात.

ह्या वेळेस दोन्ही पक्षाकदुन नवरीची बोलावण (पाठवणी) करताना दुसर्या पक्षास घरातील सर्व मानकर्यांना पुरेल इतपत शिदोरी देतात. यास भात बांधणी असे म्हणतात. यात आवश्यकतेनुसार ब्लावूज पीस, ५ किलो कणिक, १ किलो गुळ, म्नाकार्याइतक्या खोबर्याच्या वाट्या, १ किलो तुरीची डाळ, १ किलो तांदूळ ह्या सर्व वस्तू नवीन पांढऱ्या वस्त्रात बांधून देतात.