अध्याय ५ – कुंडली अर्थात गुणमेलन – १०

सर्वसाधारणपणे गुणमेलन झाल्यानंतर विवाह करणे म्हणजे सुखी, संपन्न वैवाहिक जीवनाचे ग्यारंटी कार्ड मिळवणे अशी बहुसंख्य लोकांची मनोधारणा आहे. सबब लग्न निश्चित करण्यापूर्वी वधु वरांची पत्रिका जुळल्याशिवाय पालक विवाहाबाबत पुढे जाण्याच्या मनस्थितीत नसतात. कुंडलीतील ३६ गुण मेलन हा सोपस्कार राहिला नसून त्यावर विसंबून राहण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली दिसते, याचे कारण कदाचित आपले पूर्व संस्कार, अज्ञान, भय असू शकते. यद्यपि कोणतेही ज्योतीष्यशास्त्र ज्यात गुणमेलन येते, जबरदस्तीने दैव बदलू शकत नाही. किंवा दैव बदलण्याचा ज्योतिष्यांनी सुचवलेला तोडगा म्हणजे जीवनाच्या चालू प्रवाहात खोडा घालण्यासारखे आहे. काही ठिकाणी सर्वच्या सर्व ३६ गुण जुळून आल्यानंतर सुद्धा घटस्फोट होतात अशी उदाहरणे आहेत तेव्हा काय म्हणावे? हल्ली तर गुण मेलन झाल्याशिवाय विवाह ठरवीत नाहीत तरीपण घटस्फोटाचे प्रमाण खूपच वाढले आहे.

ज्यांना भविष्याबद्दल काही ज्ञान आहे त्यांनी ज्योतिषी शास्त्राचा सल्ला घेणे अयोग्य नाही. खरे तर गुणमेलन म्हणजे थोडेसे मार्गदर्शन किंवा नियोजनास थोडी उपयुक्त माहिती.  ३६ पैकी १८ किंवा जास्त गुणमेलन झाले की पत्रिका जुळली असे समजले जाते. सर्वसाधारणपणे बहुतेकांचे गुणमेलन हे ठोक ताळ्यावर आधारित असते.  

तरीपण आपला विश्वास असल्यास अथवा आपली इच्छा असल्यास आपणास गुणमेलनासम्बंधीची आवश्यक माहिती देत आहोत. त्याचा कितपत उपयोग करायचा हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचे आहे. तथापि त्यावर सर्वस्वी विसंबून न राहता एकदा आपण लग्नाचा निर्णय घेतला की मग मोठ्या आनंदाने, उत्साहाने मनात कोणतेही किल्मिष न ठेवता विवाह कार्य पार पडावे. कारण कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी आहे आणि तो ग्रह नवमाशात कोणत्या स्थितीत असेल याविचारावर कुंडली धारकाला विविध प्रकारचे फळ मिळतच असते.

गुणमेलनाचा विचार करण्याआधी जातकाच्या (वधु / वर) व्यक्तिगत कुंडलीत विवाह सौख्य कसे आहे याचा अभ्यास करावा.

 प्राथमिक स्तरावर कुठल्या मुलास कुठली मुलगी योग्य असेल हे पडताळायचे असल्यास खालील कोष्टक सहाय्यभूत ठरेल. यात आपल्या राशीच्या मित्रराशीचा जोडीदार आपणास सर्वात सुयोग्य असे समजले जाते. शत्रू राशीचा जोडीदार टाळावा असा समज आहे.

जन्माक्षर 

राशी

मित्र राशी

समराशी

शत्रूराशी

च, ल, आ

मेष    -१

मेष, सिंह, तूळ, वृश्चिक, मीन

मिथुन कर्क मकर कुंभ

वृषभ कन्या

ई, उ, ए, व, ओ

वृषभ  -२

वृषभ मिथुन कन्या तूळ वृश्चिक

कर्क सिंह कुंभ

मेष धनु 

क, घ, गं, छा, हा

मिथुन- ३

वृषभ मिथुन सिंह कन्या धनु मकर

तूळ मीन

कर्क वृश्चिक कुंभ

ही,

कर्क   - ४

कर्क सिंह  धनु मकर

मेष वृषभ कन्या तूळ

मिथुन कुंभ

म, ट

सिंह   -५

मिथुन कर्क सिंह धनु कुंभ मीन

वृषभ तूळ वृश्चिक

मकर

हो, प, षा, ठा

कन्या   -६

वृषभ कन्या तूळ कुंभ मीन

मिथुन कर्क वृश्चिक धनु

मेष

र, त

तूळ     -७

मेष वृषभ कन्या तूळ धनु कुंभ

कर्क सिंह मकर

मीन

तो, न, य

वृश्चिक -८

मेष वृषभ  सिंह धनु मीन

मकर कुंभ

मिथुन कर्क तूळ

ये, भी, ध, फ, ढा

धनु     -९

वृषभ मिथुन कर्क मकर कुंभ

कन्या तूळ कुंभ

वृषभ मकर

भो, ज, ख, ग,

मकर -१०

सिंह कन्या तूळ

मेष तूळ वृश्चिक मीन

सिंह धनु

गे, स, दा

कुंभ  -११

सिंह कन्या तूळ मकर कुंभ

मेष वृषभ वृश्चिक धनु

मिथुन कर्क मीन

द, च

मीन -१२

सिंह कन्या वृश्चिक धनु मीन  

वृषभ मिथुन

कर्क तूळ कुंभ


वधु वर पक्षाच्या लोकांना परस्पराच्या कुळाची व गोत्र, प्रवराची जुळवाजुळव करावी व ती जमली तरच मुलामुलींची जन्मटीपण (कुंडली/ पत्रिका ) पहावयाची आहे. मुलामुलीच्या जन्म पत्रिका नसल्यास त्यांच्या व्यावहारिक (चालू) नावावरून घटीत पाहतात. गुणमेलन पूर्वापार चंद्रराशी व नक्षत्रावरून  बनवले जाते. मात्र त्यास मर्यादा आहेत. तसेच कुंडलीसंदर्भात जनमानसात काही गैरसमज आहेत त्यातील प्रमुख गैरसमज  – एखाद्याच्या पत्रिकेतील मंगल दोष हा लग्न जुळवणेसाठी मोठा अडथळा समजला जातो. ते अतिरंजित आहे. अश्या व्यक्तीस कुठल्या प्रकारची पत्रिका असलेला जोडीदार चालतो याचे विवेचन पंचांगात दिलेले आहे. त्यामुळे मंगल असण्याचा खुपसा बाऊ करू नये.

गुणमेलनसाठी खालील बाबी मार्गदर्शक ठरतील -

लोकांच्या मनातील शंका निरसनासाठी वरील विवेचन दिले आहे.