खबरदारीची सूचना अर्थात Disclaimar

ह्या संकेतस्थळावर दिलेली बरीचशी माहिती हि रूढी परंपरेतून ऐकीव स्वरुपात वाडवडिलांनी पुढील पिढीस पोहचवलेली आहे. त्यास पुराव्यानिशी शास्त्रीय आधार नाही. काही माहिती जाणकारांशी चर्चा करून संग्रहित केली आहे. तिलासुद्धा ठोस असा पुरावा नाही. तसेंच काही रूढी / परंपरा ह्या समाजाने कालबाह्य समजून त्यांचा वापर बंद केला आहे तद्वत काही नवीन प्रथा समाजाने बहुसंख्येने स्वीकारल्यामुळे त्या रूढ झाल्या आहेत व अवलंबिल्या जात आहेत. त्याबाबत सुद्धा काहीही ठोस आधार नाही. या आणि अश्या इतर कारणामुळे ह्या संकेत स्थळात दिलेली माहिती ही १००% शास्त्रशुद्ध आहे असे म्हणता येणार नाही.

ह्या संकेत स्थळात नमूद केलेली वधु आणि वर यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची माहिती;  वस्तू आणि सेवा पुरवठादाराची माहिती हि त्या त्या पक्षाने / पुरवठादाराने अथवा त्यांच्या प्रतिनिधीने दिल्यानुसार आहे, त्याची सत्यासत्यता आम्ही पडताळलेली नाही त्यामुळे त्याविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही. आम्ही दिलेली माहिती बिनचूक असावी यासाठी आग्रह धरलेला असला तरी कायदेशीर पडताळणी यंत्रणा उपलब्ध / व्यवहार्य नसलेमुळे हि माहिती प्रत्येकाने स्वतःचे जबाबदारीवर वापरावयाची आहे. शक्य त्या बाबतीत दिलेल्या माहितीची सत्यासत्यता तपासूनच प्रत्येकाने व्यवहार करावे अशी आमची आग्रही सूचना आहे.

ह्या संकेतस्थळावर दिलेली माहिती न पडताळता व्यवहार केल्यास आणि त्यात कुणाचेही काहीही नुकसान झाल्यास त्यास लेवा लग्न हि संस्था अथवा तिचे प्रतिनिधी जबाबदार असणार नाहीत आणि अश्या केसेस बद्दल काहीही नुकसान भरपाई दिली जाणार नाही.

ह्या संकेतस्थळावरील माहिती विवाहापुरत्या मर्यादित उद्देशाने दिलेली आहे आणि आमच्या सर्व ग्राहक, आश्रयदाते व हितचिंतक यांनी त्याऐवजी इतर कारणासाठी वापर करू नये. तसे करणे बेकायदेशीर असेल आणि त्याचे होणारे बरे वाईट परिणामासाठी असा गैरवापर करणारा व्यक्ती / संस्था जबाबदार धरल्या जातील व आवश्यकतेनुसार त्यांचेवर योग्य ती कारवाई करणेचा अधिकार “लेवा लग्न” हि संस्था / तिचे वारसदार / प्रतिनिधी स्वतःकडे राखून ठेवीत आहेत.

ह्या संकेत स्थळाबाबत अथवा त्यातील माहितीबाबत काहीही वाद उत्पन्न झाल्यास तो स्थानिक म्हणजे पिंपरी चिंचवड पुणे येथील न्यायालयाच्या अखत्यारीतच सोडविला जावू शकेल.