प्रतिज्ञापत्र

मी माझा मुलगा / मुलगी / पाल्य चि. / कुमारी  ------------ ह्यांची आपल्या संकेतस्थळावर सशुल्क नोंदणी करू इच्छितो / इच्छिते. ह्या नोंदणीमुळे संकेतस्थळावर उपलब्ध असलेली इतर विवाहेच्छुकांची बरीचशी खासगी माहिती मी पाहू शकणार आहे. ही सर्व माहिती संवेदनशील असू शकते आणि तिचा गैरवापर झाल्यास ती व्यक्ती तसेच संकेतस्थळ व्यवस्थापन यांचे न भरून येणारे नुकसान होऊ शकते ह्याची मला जाणीव आहे.

ह्या प्रतिज्ञापत्राद्वारे संकेतस्थळ व्यवस्थापनास मी आश्वस्थ करू इच्छितो की, संकेतस्थळावर उपलब्ध होणारी कोणतीही माहिती मी फक्त माझ्या / माझा मुलगा / मुलगी / पाल्य याच्या विवाहासंदर्भातच वापर करीन. इतर कुठल्याही कारणासाठी मी ह्या माहितीचा वापर करणार नाही.

ह्या प्रतिज्ञापत्राद्वारे संकेतस्थळ व्यवस्थापनास मी शपथेवर लिहून देतो की, संकेतस्थळावर उपलब्ध होणारी कोणतीही माहिती मी  मौखिक अथवा लिखित स्वरुपात किंवा इतर कुठल्याही मार्गाने इतरांशी शेअर करणार नाही.

संकेतस्थळ व्यवस्थापनास माझ्या कडून चुकून किंवा इतर कुठल्याही कारणाने माहितीचा गैरवापर झाल्याचे केव्हाही निदर्शनास आल्यास आणि त्यामुळे संकेतस्थळ व्यवस्थापन आणि / किंवा संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या अथवा संकेतस्थळाशी संबंधित इतर कुणाचेही काहीही नुकसान झाल्यास त्यास मी जबाबदार असेन व असे झालेले सर्व नुकसान मी भरून देण्यास बांधील असेल.