अध्याय ६ – विवाह नियोजन – ११

हिंदू धर्मातील एकूण सोळा संस्कारांपैकी विवाह संस्कार श्रेष्ठ आहे. कारण याद्वारे देव आणि पितर यांच्या ॠणातूनमुक्त होता येते.  साधारणतः सोईरिक निश्चित झाल्यावर मुलीला कुंकू लावेन संबंध पक्के केले जातात. तादापाश्चात साखरपुडा (साक्षागंध, शालामुदी) हा विधी केला जातो त्यानंतर विवाह नियोजन / तयारी सुरु होते.

पूर्व नियोजन हा विवाह कार्याचा अतूट हिस्सा आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक पालक हे आपल्या अपत्याच्या विवाह सोहळ्याचे पूर्व नियोजन कमीत कमी ४/५ वर्षे आधीपासून करीत असतात. काही कारणाने ते शक्य झाले नसल्यास आपल्या पाल्याच्या विवाहाचा निर्णय घेण्यापूर्वी परिस्थितीचे अवलोकन करून त्याप्रमाणे नियोजन / तरतूद करून निर्णय घ्यायचे असतात. नियोजनात आर्थिक, कार्याचे स्वरूप, सामाजिक, सांस्कृतिक, पारिवारिक, स्थळ काळ व वेळ, तसेच व्यावसाईक असे सर्वंकष नियोजन अंतर्भूत असते.

आर्थिक नियोजन –  कार्यासाठी आवश्यक दाग दागिने, दोन्ही पक्षांतर्फे बैठकीत मान्य केलेल्या चीज वस्तू अथवा रकम, कपडे, कार्यालय, जेवणावळ, आहेर, वाजंत्री, सजावट, मेहंदी कलाकार, पै पाहुण्यासाठीचा खर्च, गुरुजी दक्षिणा, इतर अनेक प्रकारचे किरकोळ खर्च ह्या सर्वासाठीच्या खर्चाचा अंदाज घेऊन त्यापेक्षा कमीतकमी ३०% जास्तीची तरतूद करणे आवश्यक असते. ते शक्य होत नसलेस आवश्यकतेनुसार कार्यालय खर्च, निमंत्रितांची संख्या, आहेर खर्च, जेवणावळीचा मेनू, वाजंत्री खर्च इत्यादी खर्चात काटछाट करून खर्चाचा मेळ आटोक्यात ठेवणे महत्वाचे आहे.

आमचा असा स्पष्ट आग्रह आहे की आपण विवाह समारंभ प्रसंगी बडेजावाचेप्रदर्शन टाळावे व मर्यादित निमंत्रीतासह आटोपशीर विवाह समारंभ असावा.

 

कार्यस्वरूप:- हे प्रत्येक पालक स्वतःच्या आर्थिक कुवत व सामाजिक स्थान ह्या बाबी विचारात घेवून निश्चित करीत असतो. पूर्वी विवाह समारंभ १/२/३ दिवस चालणारा प्रत्येकाचे कुवतीनुसार व्हायचा. त्याकाळी १दिवसिय म्हणजे सर्वसाधारण, २ दिवसीय म्हणजे वरमायचे आणि ३ दिवसीय म्हणजे न्हायाचे असे विवाह प्रकार संबोधले जायचे. मात्र हल्ली वेळेची मर्यादा आणि धावती जीवनशैली यामुळे साधारणपणे १ दिवसात आटोपणारे कार्य रूढ झाले आहे. क्वचित प्रसंगी आदल्या दिवशी संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम व पुढील दिवशी सकाळी विवाह विधी अशी विभागणी केली जाते. काही हौशी मंडळी स्वागत समारंभाचा वेगळा कार्यक्रम करतात. मात्र अश्या व्यक्ती मोजक्याच असतात किंवा विवाह सोहळा परक्या गावी झालेमुळे वर किंवा वधु त्यांच्या राहत्या गावी असा स्वागत सोहळा करीत असतात. आर्थिक अडचणीत असलेले पालक आपल्या पाल्याचे विवाह मोजक्या अगदी जवळच्या नातेवायीकासह एखाद्या मंदिरात / धार्मिक ठिकाणी जेवणावळिस फाटा देवून / अल्पोपहार देवून अल्पखर्चात उरकतात. घटस्फोटीत अथवा विधवा / विदुर यांचे विवाह सुद्धा मोजक्या व्यक्तीच्या उपस्थितीत फारसा गाजावाजा न करता केली जातात. अश्या पुनर्विवाहास गांधर्व विवाह असे सुद्धा संबोधले जाते.

विवाह सोहळ्यात सर्व विधी करीत असताना आपल्या संस्कृतीचे औचित्य राखले जाईल आणि जतन केले जाईल अशी काळजी व खबरदारी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण आर्थिक दृष्ट्या  सबळ असल्यास आपण आपल्या कार्य सोहळ्यात स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळेल अशा कार्यक्रमाचे आयोजन करावे. डी जे सारख्या ध्वनी प्रदूषण आणि आरोग्यास घातक उपकरणासाठी खर्च करणे टाळावे तसेच सार्वजनिक रस्त्यावर मिरवणूक काढून, बीभत्स नाच करणे व त्यामुळे वाहतुकीत व्यत्यय आणणे पूर्णतया टाळावे.

प्रत्येक व्यक्तीस आपले / आपल्या घरचे कार्य हे धुमधडाक्यात व उत्साहात / जोशात पर पडावे अशी इच्छा असते आणि ते साहजिकच आहे मात्र आपण आपल्या ह्या कार्यासाठी आपल्या सर्व नातेवाईक इष्ठ मित्र यांना सपरिवार निमंत्रित करीत असतो, त्यापैकी बरेच जण स्वतः चे काम बाजूला ठेवून आपल्या प्रेमाखातर आलेले असतात, त्यांचा वेळ अमूल्य आहे आणि तो नाहं वाया घालवण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही याची जाणीव ठेवून आपण आपल्या कार्याचे अचूक नियोजन करून मुहूर्त वेळ पालवी असे आम्ही आपणास आग्रहाने सुचवू इच्छितो.

स्थळ, काळ व वेळेचे नियोजन: 

पूर्वीच्या काळी विवाह हे मुलीच्या पालकांच्या घरी / अंगणात / वाड्यात संपन्न होत असत. मात्र बदलत्या काळानुसार घराचे अंगण अथवा वाद संस्कृती शिल्लक नसलेमुळे विवाह हे कार्यालयात संपन्न होत आहेत. अशी कार्यालये प्रत्येक खेड्यापाड्यातून उपलब्ध होऊ शकत नाहीत त्यामुळे कार्यालय असेल अश्या सोयीच्या ठिकाणी विवाह सोहळा करावा लागतो.  कार्यालये मर्यादित असल्यामुळे आणि मागणी जास्त असल्यामुळे कार्यालय उपलब्ध असेल अश्या तारखांना लग्न करावे लागत असतात. कार्यालय उपलब्ध व्हावे म्हणून विवाह निश्चिती बराच काळ आधी करणे भाग असते. त्यामुळे चट मंगनी पट शादी हे हल्ली शक्य होऊ शकत नाही. कार्यालय निश्चित करताना ते वर आणि वधु अशा दोन्ही पक्षास सोयीस्कर होईल असे; वधूचा मासिक राजोधर्म टाळून, आणि आपल्यास हवे त्या तारखेस उपलब्ध असेल असे निकष लाऊन निश्चित केले जावेत. दोनही पक्षास सोयीचे होईल असे कार्यालय उपलब्ध नसल्यास कमीत कमी कुणा एका पक्षास सोयीचे होईल असे कार्यालय निवडावे आणि त्या पक्षाने सर्व व्यवस्थेची जबादारी सांभाळावी अश्या समाजास्याने कार्य सुकर करता येऊ शकते.

विवाह तिथी / मुहूर्त ठरविताना कार्यालयाची उपलब्धता ह्या निकशाबरोबर दोन्ही पक्षांच्या घरातील / जवळच्या नात्यातील व्यक्तीच्या सोयी / प्रमुख व्यक्तींना कार्यालयातून सुटी मिळणे शक्य आहे किंवा नाही /त्यांच्या घरी काही कार्ये असल्यास त्यात अडथळा येवू नये हा उद्देश्य / आवश्यक खरेदी आणि निमंत्रण करणेसाठी पुरेसा वेळ / मुलांच्या परीक्षा /  पाऊस शक्यता इत्यादी बाबींचा विचार करून विवाहाचा मुहूर्त निश्चित केला जावा.

लग्न मुहूर्त साधारणपणे तीन समई निश्चित केले जातात. १० गोपाळ मुहूर्त म्हणजे सकाळची वेळ , २) गोरज मुहूर्त म्हणजे संध्याकाळची वेळ व तिसरा स्टण्डर्ड टाईम म्हणजे दुपारची वेळ.

वाहतूक व्यवस्था : आपल्या कार्यासाठी आपणास स्वतः साठी तसेच वऱ्हाडी मंडळी, पाहुणे आदिसाठी भाडोत्री वाहनाची आवश्यकता असते. ती व्यवस्था करताना शक्यतो शासकीय वाहने ठरवावीत अथवा विमा सुविधा असलेली सुरक्षित वाहने ठरवावीत.

विवाह कार्यासाठी काही रुढ संकेत व पथ्ये: