विवाह पश्चात समुपदेशन

लग्न म्हणजे एक अत्यंत महत्वाचा संस्कार. आयुष्याला कलाटणी देणारी घटना. आयुष्यात इतके मोठे स्थित्यंतर घडून येत असताना त्याकडे वस्तुतः निट लक्ष देवून पहायला हव, पण अर्थ न समजून घेताच यंत्रवत पद्धतीन लग्नात धार्मिक विधी पार पडले जातात. पूज्य साने गुरुजी म्हणायचे कि, पुरुषाने स्त्रीचे गुण घेणे व स्त्रीने पुरुषाचे गुण घेणे म्हणजे खरे लग्न. लग्नात मात्र नवरदेव हसरा, किंचित निश्चिंत, काहीसा विजेत्या मुद्रेतील असतो. नवरी मात्र तिच्या साजश्रुन्गारातूनही कावरीबावरी दिसते. विवाहोत्तर जीवनात विकास करणाऱ्या सर्व कला, विज्ञान, संस्कृतीच्या दिशेने वाटचाल करण्याचा अधिकार दोघा पती पत्नींना आहे. त्यासाठी विवाहपश्चात समुपदेशन अधिक महत्वाचे ठरते.