अध्याय २ – विवाह पूर्व समुपदेशन - ७

विवाहपूर्व समुपदेशन हे दोन सत्रात विभागले जावू शकते.

पहिले सत्र म्हणजे मुलामुलींचे ११ वर्षे वयापासून त्याच्यावर केले जाणारे संस्कार व ते वावरत असलेल्या वातावरणाचा परिपाक. ह्या काळात पालकांनी आणि विशेष करून आईने मुला मुलींचे मित्र व मार्गदर्शक अश्या दुहेरी भूमिका बजावणे आवश्यक असते. त्यानुसार त्यांना समजून घेणे, त्यांच्या सोबत असणारे मित्र / मैत्रीण यांची सहा निशा करून घेणे, त्यांचे वस्त्र परिधान पद्धती / रुची, इतरांशी संवाद साधताना विनम्र भाव असावा ह्याची जाण, त्यांच्या संगणक व मोबाईल वापरावर नजर व वचक ठेवणे, त्यांची बौद्धिक पातळी संकुचित अथवा आत्मकेंद्रित न राहता विस्तृत व उच्च अभिरुचीची व्हावी यासाठी पोषक वातावरण व चर्चा घडवून आणणे, मुला मुलीनी एकलकोंडे होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, त्यांचेबरोबर फिरायला जाणे, एकत्र जेवण घेणे, त्यांचे छंद व आवड निवड याविषयी सकारात्मक भावी दिशादर्शक मार्गदर्शन करणे, घरातील वातावरण आनंदी व सौहार्दाचे राहील अशी दक्षता घेणे इत्यादी बाबी प्रकर्षाने महत्वपूर्ण ठरतात. समाजातील सर्व थरातील कुटुंबियांना हे सहज साध्य असते. रामायणातील सीतामाईने रानात राहून आपल्या पुत्रांना एवढे सक्षम केले की त्यांनी आपल्या पित्याला त्यांच्या अश्वमेध यज्ञाचा घोडा रोखून आव्हान दिले. हे त्याबाबत एक आदर्श उदाहरण म्हणता येईल. मात्र ह्या सत्राचा विवाह विधीशी प्रत्यक्ष फारसा संबंध नाही.

दुसरे आणि विवाहाशी संबंधित महत्वाचे सत्र म्हणजे विवाहाविषयीचा निर्णय घेतेक्षणीच्या परिस्थितीनुसार आवश्यक असे समुपदेशन. ह्या वेळी मुला मुलीनी हे समजून घेणे अगत्याचे आहे की, आपल्या जीवनात येणारी व्यक्ती १००% आपल्या मताशी जुळणारी असणे कदापि शक्य नाही. ती एक भिन्न व्यक्ती आहे, निसर्गनियमानुसार तिचे स्वतः चे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ती वेगळ्या वातावरणात, वेगळ्या संस्कारात वाढलेली व्यक्ती असणार आहे. त्यामुळे आपण ह्या बाबी समजून त्या वेगळेपणाचा स्वीकार करावयाचा आहे. तिला तडजोड न समजता स्वीकारल्यास आपल्या पुढील अनेक समस्याचे स्वरूप बदलू शकते आणि आपले सहजीवन सुखी होऊ शकते. लग्न म्हणजे दोघांनी एकत्र येणे एवढे मर्यादित नसून ते दोन कुटुंब, दोन भिन्न संस्कार, भिन्न चालीरीती एकत्र येणे होय आणि ते जसे आहे तसे स्वीकारणे हाच विवाहाचा मुख्य गाभा आहे. विवाह म्हणजे,  वि – विधीपूर्वक, वा – वास्तवाचे भान ठेवून, आणि ह – हयातभर एकत्र राहण्याची शपथ घेवून केला जाणारा विधी. ह्याला अर्थातच धार्मिक जोड पण आहे.

मुलीस विवाहापूर्वी पालकांनी सांगायला हवे की आता तू त्या घरची ग्रुहलक्ष्मि होणार आहेस, तेव्हा त्यांच्या शब्दाला आणि आम्हास कमीपणा येईल असे वागू नकोस. त्या घरच्या परंपरा, चालीरीती, तू स्वीकारायच्या आहेस. आपल्या सासू सासऱ्याना तुझ्या आई वडिलांच्या रूपातच तू पहा. भोरगाव पंचायत मध्ये काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायला लागली आहे ती हि की, मी उच्च शिक्षण घेतले आहे, मी नोकरी करते असा अहंभाव मुली मध्ये वाढीस लागला आहे. शिवाय मुलींची कमतरता असल्याने मुलींचा इगो / अहंकार मुलांपेक्षा इतका वाढला आहे की, मुली कुठलीही तडजोड करायला तयार होत नाही. पूर्वीपासून मुलीस परक्याच धन म्हणून संबोधले जाते, मात्र ते तितकेसे संयुक्तिक वाटत नाही कारण धन हे खर्च होत असते. त्याऐवजी मुलगी हि दोन कुटुंबाना अर्थात दोन धाग्यांना एकत्र जोडणारा गुरुबिटमोती आहे असे म्हणावयास हवे. दोन्ही कुटुंबातील जे चांगले असेल  ते एकत्र करून तिने आपला संसार सुखाचा करावा. हळुवारपणे सुसंवाद साधून, विचारांची देवाण घेवाण करून संसार फुलवायचा असतो. लहानपणी मुलीस आई बाबा बऱ्याच वेळेस रागावतात, अनेक प्रसंगी तिची काहीही चूक नसते तरी पण ती त्यांना प्रेमाने मिठी मारत असतेच. तसेंच तिने आपल्या सासूचे बाबतीत आपली आईच रागवत आहे समजून घ्यावे, नणंद जवळची मैत्रीण म्हणून स्वीकारावी व दिरास लहान भावाप्रमाणे वागवावे. त्याचबरोबर आईने मुलीस बिदाई पूर्वी दोन वचने अवश्य सांगावीत –

वरील ओवीचा अध्यात्मिक अर्थ वेगळा, पण संसारातील अर्थ मी असा काढला आहे की, संसार हा एक सुखाचा सागर आहे, तुम्ही जेवढे हात माराल, तेवढे अधिक सुख मिळणार आहे. आणि शेवटी सुख हे फक्त मानण्यावर आहे.

समुपदेशक - डॉ सौ शामलाताई गुणवंतराव सरोदे,

                  सावदा.

 

कुणाचाही लग्न ठरलं कि त्याच्या मनात एक वेगळाच आनंद, हुरहूर, काहीशी उत्कंठा, थोडीशी भीती आणि समाधान या भावनांचं संमिश्र मोहोळ उठते. चिरपरिचित आणि नात्यागोत्याच्या माणसाना सोडून, आपल्या घराच्या आणि अंगणातल्या मुक्त वावराच्या आठवणीतून ती अगदी वेगळ्या, अनोख्या आणि मनाला किंचित भेदरवून टाकत असलेल्या वातावरणाला नव्याने सामोरी जाणार असते. कस असेल आपल नव आयुष्य? कस राहील आपल वैवाहिक जीवन? पुढे सगळ व्यवस्थित होईल न? अशा अनेक प्रश्नाचं काहूर तिच्या मनात थैमान घालते. अश्या वेळी खर समुपदेशनाची गरज भासते.