अध्याय २३ – विवाह विधी भाग ११ – बिदाई -२८

झालापूजन व सुक्या पूजन झाल्यानंतर बिदाईला सुरुवात होते. लग्न  बिदाईकरण्यासाठी गावातील / सर्व पाहुणे मंडळीस बोलावतात. लग्न बिद्या करण्याआधी वधु पक्षाकडील गौरघारातील लामणदिव्यावर गव्हाची धार सोडून तो विझवतात. देव्हाऱ्यातील देवाच्या पाया पडतात. दोन्ही पक्षाकडील वडीलधार्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पाया पडतात. हा क्षण भावूक असतो नवरा नवरीला फुलांची जाळी (वल) बांधून पाटावर बसवतात व (वधुपक्षाकडील) सर्व जण त्यांना ओवाळणी करतात. वरपक्षाकदिल जबाबदार व्यक्तीने वधुपक्षाकदिल मानदार व्यक्तींना सत्यनारायण पूजेसाठी ठरलेल्या दिवशी येण्याचे आमंत्रण द्यायचे असते. ते न चुकता अवश्य आणि दिवस, वेळ, किती पाहुण्यांनी यायचे याबद्दल सविस्तर आणि स्पष्टपणे चार चौघात आमंत्रण करावे.  लग्न मंडपातून निघताना दोन्ही व्हाही एकमेकाच्या तोंडात गुळ / पेढा भरवतात आणि एकमेकांना आलिंगन देतात. सासरी जाणाऱ्या वधूला तिची आई लक्ष्मिचि पावले व हस्तक्षरातिल सप्तपदी देते. सोबत आंदण व रुखवत वैगैरे वरपक्षाच्या वाहनात ठेवतात. व त्यावेळेस वरपक्षाकडून आलेल्या सूचनेनुसार ब्लावूज पीस, पाच किलो कणिक, गुळ, खोबाय्राच्या वाट्या, १ किलो डाळ (तुरीची), १ किलो तांदूळ हे सर्व साहित्य  एकत्र पांढऱ्या वस्त्रात बांधावे व वरपक्षाकडील महिला मंडळीस द्यावे. यास भात बांधणे, वर पक्षाकडे भात देणे असे म्हणतात. त्यानंतर वर, वधु आणि वऱ्हाडी मंडळी वरगृही जाण्यासाठी प्रस्थान करतात. वधु बरोबर तिची लहान बहिण किंवा आत्या / मावशी पाठराखीण किंवा घळ्ळी म्हणून पाठवतात. सत्यनारायण पूजा झाल्यानंतर ती पाठराखील आपल्या घरी परत येते. त्यावेळेस वरपक्षातर्फ़े तिचा कपडे देवून सन्मान करतात.