अध्याय २४ – विवाह विधी भाग १२ – नवदाम्पत्याचे घरी आगमन - २९

वरपक्षाकडील वऱ्हाड  स्वग्रामी आल्यानंतर वरपक्षाच्या जवळच्या नातेवाईकाच्या घरी वधु वरांना थांबवितात. तेथून वाजत गाजत वरातीने ग्राम उपास्य दैवत मंदिर, कुलदैवत मंदिरात जावून पाया पडतात. कुलदैवत / देवतांचे आशीर्वाद घेवून स्वगृही येवून गृह प्रवेश करतात. यात वधु गृहलक्ष्मि म्हणून उजव्या पायाने धान्याचे मापटे उलटे करते, याला माप ओलांडले असे म्हणतात. हि क्रिया घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर करतात. याशिवाय काही ठिकाणी एका मोठ्या परातीत कुंकू मिश्रित पाणी ठेवतात. माप ओलांडल्यानंतर वधु आधी आपला उजवा पाय त्या परातीत ठेवते, नंतर डावा पाय ठेवते. त्यानंतर उजवा पाय प्रथम बाहेर काढत पाच पावले पुढे जाते. त्यामुळे घरात लक्ष्मिचि पावुले आलीत अशी अशी समजूत आहे. घरात आल्यावर घरातील गौर घरातील लामण दिवा त्यावर गव्हाची धार टाकून विझवतात.

हळद फेडणे – वधु वरांनी वर पक्षकदिल गौर घरातील नंदादीप / लामण दिवा विझावाल्यावर पाच सवाष्णी वधु वराचे ओक्षण करतात, त्यांना ओवाळतात. पाच कलश, पाच बाजूस ठेवून जी तिथी असेल तेव्हढे सुताचे अखंड फेरे गुंधालातात. या कलशांमध्ये आबात पाणी (ज्या पाण्यास हस्त स्पर्श झाला नाही असे पाणी) भरतात. ते पंच महा नद्यांचे प्रतिक मानून त्यात तीकासा (सुगंधी द्रव्य) किंवा उताणे घालून नवरदेव नवरीस एकत्रित न्हावू घालतात. त्य विधीलाच हळद फेडणे असेही म्हणतात.

सूनमुख दर्शन – पूर्वी लेवा पतीदारामध्ये वरमाता वधुगृही लग्नास जात नसे. वधूचा गृह प्रवेश झाल्यावर सून मुख दर्शन विधी होई. लेवा पतीदारामध्ये माप ओलन्दन्यपेक्षा सुनमुख दर्शनावेळी वधूची ओटी भरण्याला अधिक महत्व होते. आता वरमाता वधु पक्षाकदे जावू लागल्याने सुनमुख दर्शन मांडवातच होत असते म्हणून हा विधी करीत नाही.

देवाकोथ्थापन / मडपोद्वासन – मांडलेल्या देवाकाचे विसर्जन आणि केलेल्या मंडपाचे उद्वासन यास देवाकोथ्थापन व मंडपोद्वासन असे म्हणतात. देवक ठेवल्यापासून दुसऱ्या, चौथ्या, आठव्या, दहाव्या अशा सामादिवशी किंवा फाचाव्या आणि सातव्या या विषम दिवशी दिवसा पूर्वान्हात देवाकोथ्थापन आणि मदपोद्वासन हे दोन्ही विधी करावेत. देवक ठेवणाऱ्या गृहस्थाने आपल्या पत्नीसह मंडपात पूर्वेकडे तोंड करून बसून आचमन व प्राणायाम करावा. नंतर असा मंत्र म्हणावा – विवाहाच्या अंगात्वा रूपाने स्थापन केलेल्या देवतांचे उथ्थापन आणि मंडपाचे विसर्जन व त्याचे अंगभूत गणपती पूजन व पुण्यः वाचन करतो व सर्व देवतांचे प्रत्येकी वाहिवातीप्रमाणे पूजन करावे. त्यानंतर देवताना गुंधालालेले सुत काढून टाकून देवतांचे आंब्याचे डहाळे, देवाकाचे सुपात ठेवून त्यावर पाण्याचा  अभिषेक करून उरलेले ताम्हनातील पाणी तेथे पाणी तेथे सहकुटुंब असलेल्या यजमानाच्या मस्तकावर पडेल अशा रीतीने शिंपडावे.

यजमानाने आपल्या पत्नीसह भोजन करावे म्हणजे देवाकोथ्थापन व मदपोद्वासन हे विधी संपले.