अध्याय १३ – विवाह विधी भाग १ – तोरण ताटी -१८

लग्नाच्या आधीच्या दिवशी संध्याकाळी वधु / वर पक्ष आपापल्या घरी समोरच्या दरवाज्याला  तोरण ताटी बांधतात. हा लौकिक विधी मामाच्या हस्ते पर पडायचा असतो.  लग्नाच्या आदल्या दिवशी घराचा मुख्य दरवाजा, देवघर, मांडव, हाँल यांच्या सर्व प्रवेशद्वारांना आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. त्याचप्रमाणे दरवाजे व घर सुशोभित करावे. तोरण ताटीला ५/६ तुरखाट्याचा एक असे ५/७/९ पिलर्स असतात. हे पिलर्स तुरखाट्याच्या आडव्या विणीने जोडलेली असतात.  तोरणताटी हि सव्वा महिना काढायची नसते. सव्वा महिन्यानंतर त्याचे विधिवत विसर्जन करतात. तोरणताटी बांधल्यानंतर त्यात ५ आंब्याचे डक्षे लावतात. आपल्या पुर्वाज्यांचे सातव किंवा आढाव असते त्यानुसार सुतळीमध्ये खोबऱ्याच्या ७ किंवा आठ वाट्याची माळ तयार करून तोरणताटीस बांधाव्या. वधु पक्षाने एक माळ बिदाईचे आधी भात बांधतेवेळी वर मंडळीच्या हातात द्यावी. तोरणताटी बांधते वेळेस सर्व भाऊबंदाना आमंत्रण दिले जाते. तोरण ताटी व तोरणे बांधल्यानंतर अम्बोला भात शिजवण्याचा विधी असतो.

अम्बोला भात म्हणजे ज्वारी कांडून शिजवलेला भात.