अध्याय २१ – विवाह विधी भाग ९ – व्याही भोजन -२६

आतापर्यंतचे सर्व विधी पार पडल्यानंतर आणि वऱ्हाडी / पाहुणे मंडळीची जेवणे उरकल्यानंतर वधु व वरास, व्याही व्हाही आणि विहिणी विहिणी यांना जवळ जवळ जेवायला बसवतात. त्या व्हाही भोजन कार्यक्रम प्रसंगी सर्व मानकरी मंडळी जेवायला बसते ते ताटांची जागा रांगोळी काढून, अगरबत्ती लावून सुशोभित व सुवासिक केलेली असते. त्याठिकाणी तांब्या भरून पाणी व फुलपात्र जेवणाचे पानाजवळ ठेवावे. पूर्वी मुलीला अपत्य होईपर्यंत वधु पित्याने आपल्या मुलीच्या घरी जेवायचे नसते असा दंडक होता. त्यामुळे व्हाही व्हाव्ही जवळ जवळ जेवायला बसवतात. वरास घास घेण्याआधी त्याचा दागिना देवून सन्मान करतात. तद्वतच नवरदेवाच्या ताटाखाली टेकन म्हणून काही रक्कम ठेवतात. नवरदेव लग्नात रुसू नये म्हणून हि प्रथा पडली असावी. वऱ्हाडणीच्या पंक्तीला वधु मातेने वर मातेस अंगठी घालावी व उचलून वाढलेल्या पानासमोर बसवावे.  वरमातेचा हा मान नवरदेवाच्या लहान काकूचा असतो अशी प्रथा आहे.  

रुखवत – रुखवत वधु पक्षाकडून वर पक्षास दिला जातो. पूर्वी रुखवतात सव्वा शेराचा दराबा, टोपलीभर  तिळाचे ----, टोपलीभर दल्यांचे -----, कुरमुर्यांचे ----- लाडू आणि सव्वा शेर बेसन पीठाचे शेव असत. आता वर पक्षाने सांगितल्याप्रमाणे गावरान तुपाचे दराबा लाडू, शेव, चिवडा, स्वतंत्रपणे ४०० ते ५०० पाकिटे तयार करून रंगीत कागदाने पँकिंग केलेल्या खोक्यात आणतात. वरपक्षाकडिल पाहुण्यांना ह्या रुखवताच्या पुड्या वरपक्षातर्फ़े वाटप केल्या जातात. तसेच वरपक्षाच्या घरच्यासाठी ४ स्टीलच्या डब्यात अनुक्रमे चार किलो दराबा लाडू, चार किलो शेव, ५१ करंज्या, चार किलो चिवडा भरून द्यावा. मांडवामध्ये रुखवत देताना विहिणी विहिणी ह्या वस्तू देवून गंमत जंमत करतात. ह्या प्रसंगाची आवर्जून शूटिंग घ्यावी. नंतर सी डी पाहताना व्हाही खुश होतात.