संकेत स्थळ पूर्व पिठीका –२

लेवा भ्रतृमंडळाच्या स्थापनेपासूनच आमच्या कार्यकारिणीचा असा प्रयत्न होता की, मंडळातर्फे वर / वधु पालकांना सहज, सोपा, आर्थिक बचत करू शकणारा सर्वांगसुंदर पर्याय उपलब्ध करून दिला जावा. सध्या वर / वधु पालकांना आपल्या पाल्यांच्या लग्नासाठी सुयोग्य जोडीदार शोधणे फारच खर्चिक आणि अवघड झालेले आहे. वेगवेगळ्या समाज मंडळाद्वारे वेगवेगळ्या शहरात वधु वर सूच्या प्रकाशित केल्या जातात व वधु वर मेळाव्यांचे आयोजन केले जाते. पालकांना किंवा वर / वधूस ह्यस सुच्यामध्ये आपले नाव नोंदवावे लागते. त्यानंतर सूची प्रकाशित झाल्यावर ती खरेदी करणे (प्रत्येक ठिकाणच्या कमीतकमी २ /३ सूच्या खरेदी कराव्या लागतात), तेथील मेळाव्यास वर / वधु आपापल्या पलाकासह अथवा इतर नातेवाईक / मित्रमंडळी सह हजर राहणे, मेळाव्याच्या ठिकाणची सर्वांची प्रवेश फी, त्यासाठीचा प्रवास, राहणे, खाणे आदि खर्च हे सर्व फारच खर्चिक, वेळखाऊ व जिकीरीचे होत असते. आणि सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे कुठल्याही वर / वधूचे लग्न सहसा एका प्रयत्नात ठरू शकत नाही. त्यासाठी २ ते ३ वर्ष सतत प्रयत्न व शोध घ्यावा लागत आहे. थोडक्यात हा वर / वधु संशोधनाचा लग्न ठरणे आधीचा खर्च व वेळेचा होणारा अपव्यय सध्या तरी अटळ झालेला आहे. आणि त्यावर सर्वांच्या हिताच्या दृष्टीने तोडगा काढण्यासाठी व पालकांची होणारी ससेहोलपट कशी टाळता येईल यासाठी आम्ही सुरवातीपासूनच विचार करीत होतो. काही संकल्पना आम्ही कार्यकारिणीतील मंडळीनी निश्चित केल्या परंतु त्या अमलात आणणे आर्थिक पाठबळाभावी आम्हास मागील ४ वर्षापासून शक्य होत नव्हते. ४ वर्षांच्या विचार मंथन व संकल्पना सुस्पष्टीकाराणानंतर गुंतवणूक दाराच्या भागीदारीतून हि संकल्पना राबविणे सहज सुलभ झाले.

आमच्या ह्या प्रयत्नास मागील वर्षी सकारात्मक प्रतिसाद मिळाला व मार्च २०१७ अखेरीस आमच्या ह्या भागीदारी प्रकल्पास मूर्त स्वरूप मिळाले. त्यानंतर संकेतस्थळ व मोबाईल अँप विकसित करणेस सुरवात होवून आजमितीस प्राथमिक स्वरूपातील संकेतस्थळ व मोबाईल अँप विकसित झालेले आहे. आमच्या संकल्पनेतील सर्व बाबी त्यात अंतर्भूत करणे सुरवातीस शक्य नव्हते कारण त्यासाठीचा आवश्यक माहिती साठा गोळा करायला अवधी लागणार आहे. ते काम सुरु आहे. आणि जसजशी माहिती उपलब्ध होईल तशी ती संकेतस्थळात अंतर्भूत करणेत येईल. आमची अशी खात्री आहे की मार्च २०१८ पर्यंत आमच्या संकल्पनेतील परिपूर्ण विवाह विषयक संकेतस्थळ विकसित झालेले असेल.

आम्ही यापुढे विवाह करू इच्छिणाऱ्या सर्व वधु / वर आणि त्याच्या आप्त इष्टांना विनंती आणि आवाहन करू इच्छितो की त्यांनी आपल्या जोडीदार निवडीसाठी आमच्या ह्या संकेतस्थळाचा उपयोग जरूर करावा. त्यायोगे आपणास घर बसल्या सुयोग्य जोडीदार शोधणे सहजसोपे होणार आहे.

आमच्या ह्या संकेतस्थळावर आपणास काय काय मिळणार आहे? आमची अशी संकल्पना आहे की, ह्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे आपण स्वतः कुणाचीही मदत न घेता सर्व कृती व मंत्रासह सर्व विधी करू शकता –

ह्या संकेतस्थळावर नोंदणी कशी कराल

प्रतिज्ञापत्राची आवश्यकता का आहे?  ह्या संकेतस्थळावर नोंदणीकृत सभासदांची खासगी स्वरुपाची भरपूर माहिती उपलब्द असू शकेन. तिचा कोणीही गैरवापर करू नये / ती माहिती इतरास देवू नये म्हणून हे प्रतिज्ञापत्र गरजेचे आहे. समाजातील काही व्यक्ती या माहीतीचा गैरमार्गासाठी उपयोग करू शकतील. संकेतस्थळ विकसित करताना आम्ही त्यासाठी शक्य ती व आवश्यक तेव्हढी तरतूद करीत आहोतच तरी पण गैर उपयोगाचे सर्व मार्ग टाळणे व तुमचे खाजगी आयुष्य सुरक्षित करणे यास आम्ही प्राधान्य देतो आणि म्हणूनच नोंदणी स्वीकारताना काही खबरदारी घेणे आम्हास गरजेचे आहे. प्रतिज्ञापत्र हा त्याचा एक भाग आहे.

नोंदणी फी किती असेल –  नोंदणी फी कमीतकमी असावी व विवाह्कर्त्याना आर्थिक तसेच वेळ, दगदग यापासून सुसह्य प्रमाणात लाभ व्हावा हा आमचा प्रमुख उद्देश आहे आणि म्हणूनच आमची नोंदणी फी २००० रु असावी असे आम्ही निश्चित केले आहे. पुढेमागे महागाई व अनुभवानुसार त्यात बदल होवू शकेल. एकदा नोंदणी फी भरल्यानंतर आपले / आपल्या पाल्याचे लग्न होईपर्यत किंवा ३ वर्षासाठी नोंदणी वैध असेल. ह्याकाळात आपले / आपल्या पाल्याचे लग्न न होवू शकल्यास आपण विशेष विनंती करून विनामोबदला अथवा अत्यल्प फीमध्ये नोंदणीचे पुनरज्जीवन करू शकाल.

आपणास नोंदणी फी व्यतिरिक्त काही इतर खर्च करावा लागणार आहे काय? आम्ही संकेतस्थळावर आपला कौटुंबिक व्हिडिओ टाकता येईल असे म्हटलेले आहे. हा व्हिडिओ चागल्या गुणवत्तेचा असल्यास आपल्या भावी जोडीदार आणि त्याचे कुटुंबीय यांचे मत सकारात्मक होण्यास मदत होवू शकेल आणि असा व्हिडिओ आपणास धंदेवाईक छायाचीत्रकारच तयार करून देवू शकेल. तेवढा एकच जास्तीचा खर्च आपणास करावा लागू शकतो इतर कोणताही छुपा खर्च नाही.

मंडळातर्फे वधु / वर आणि त्यांचे पालक यांचा मेळावा आयोजित केला जाईल काय? आमच्या ह्या संकेतस्थळाचे उद्दिष्ट मेळावे टाळता यावे असे आहे त्यामुळे असे मेळावे आयोजित करणे संयुक्तिक होणार नाही. तरी पण नोंदनिधारकांनी विनंती केल्यास वधु वरांचे गुण दर्शन होऊ शकेल असा उपक्रम आयोजित केला जाऊ शकेल. मात्र त्यासाठीचा आर्थिक भर सहभागी व्यक्तींना उचलावा लागेल.

         मित्रहो, वरील माहितीवरून आपण समजून चुकला असाल की “लेवा लग्न” हे आमचे संकेतस्थळ किती उपयुक्त व फायदेशीर आहे. आमच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या परंपरेला साजेसे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासास वाहून घेतलेल्या इतर सर्व उपक्रमाप्रमाणे हा उपक्रमसुद्धा आपण मनोभावे स्वीकाराल ह्याची आम्हास खात्री आहेच. तुमच्या बरोबरच आमच्या कार्याची ओळख नसलेल्या समाज बांधवांना आपण ह्या उपक्रमाची माहिती द्याल आणि आमच्या ह्या संकेतस्थळ योजनेस भरघोस प्रतिसाद द्याल अशी मी अशा करतो.

आपल्या ह्या संकेतस्थळावर प्रत्येक महत्वाच्या शहरातून विवाह विषयक वस्तू व सेवा देणाऱ्या व्यक्ती / संस्थांची नोंदणी करणेची आहे.

आपणास विनंती की आपल्या ओळखीत अश्या वस्तू / सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था असल्यास त्यांना आपल्या ह्या संकेतस्थळावर नोंदणी करणेस उद्द्युत करा. मार्च २०१८ पर्यंत अशी नोंदणी मोफत करता येणार आहे. ह्या नोंदणीच्या माध्यमातून नोंदणी दारांना विनासायास व्यवसाय मिळणार आहे. मार्च २०१८ नंतर अश्या नोंदणीस नोंदणी फी आकारली जाणार आहे याची नोंद घ्यावी. ईव्हंट मनेजर, मंगल कार्यालये, सजावटकार, केटरर, संगीत जलसाकार, गायक, वादक, प्रमुख कापड दुकानदार, प्रमुख भेटवस्तू दुकानदार, प्रमुख किराणा दुकानदार, प्रमुख जुवेलर, मंडप व भांडी पुरवठादार, वाजंत्री समूह, घोडा पुरवठादार, अक्षता, फुले, मिठाई आदि पुरवठादार, गुरुजी, फटाके पुरवठादार या आणि यासारखे विवाह समारंभासाठी आवश्यक सर्व वस्तू व सेवा पुरवठादार ह्या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतील.

श्री गणपती अथर्व शिर्षामधील फालाश्रुतीमध्ये एक श्लोक आहे, “इदं अथर्व शीर्ष शिष्याय न देयं”. याचा अर्थ हे अथर्व शीर्ष शिष्याला देवू नये. मग कुणाला द्यावे? तर हे अथर्व शीर्ष वडिलांनी आपल्या मुलाला द्यावे. त्याच प्रमाणे लाग्नाविशायीची इत्थंभूत माहिती विधी व मंत्रासह आम्ही समाजासाठी देत आहोत.